वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी – युवासेनेकडून तहसीलदारांना निवेदन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच सप्टेंबर–ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास करमाळा–कुर्डवाडी रस्त्यावर अर्जुननगर फाटा येथे रास्ता आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख समाधान उर्फ शंभुराजे फरतडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे महसूल विभागाकडून वेळेत पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना मदत प्राप्त झाली आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत
- अनेक शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी पेंडिंग असून विशिष्ट क्रमांकाचे कोड टाकून ते अप्रूवल करावे लागत आहेत हि प्रकिया संथ गतीने होत आहे ति प्रकिया गतीमान करण्यात यावी.
- अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे मात्र ज्यांचे पिक कर्ज, मुद्रा लोण, किसान क्रेडिट कर्ज थकीत आहे व एनपीए मध्ये गेले आहे अशा शेतकऱ्यांच्या रक्कमा बॅंकांनी गोठवून ठेवल्या आहेत
- अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, इ केवाईसी पुर्ण आहे तसेच बाधित यादीत अनुदान मंजूर असून देखील पैसे खात्यावर जमा झालेले नाहीत.
- समान क्षेत्र असताना नुकसानभरपाई च्या रक्कमात तफावत आहे दुरूस्त यादी पाठवताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन न झाल्याने सरकारच्या घोषणे पेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पंचनामे झाल्यानंतर त्या साठी देखील मदत मंजूर झाली आहे मात्र ठराविक गावातील शेतकऱ्यांनाच ति रक्कम मिळाली आहे . अद्याप अनेक गावातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तरी मे महिन्यातील अवकाळी नुकसानीची यादी समाविष्ट गावांसह मिळावी.
- सन २०२२-२३ व २०२३-२४ मधील काही शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही तसेच काही शेतकऱ्यांचे तांत्रिक चुका मुळे मंजूर रक्कम परत गेली आहे त्याची लिखित कारण मिळावे .

या निवेदनावर शामराव मासाळा-अंजनडोह, रमेश शिर्के पांडे, रविंद्र भोसले वीट, बाळासाहेब राऊत वीट,अविनाश गाडे वीट ,दिंगबर काटुळे सौंदे, अभिमन्यु हुंबे हिवरे, दत्तात्रय ढाळे वाघाची वाडी, प्रवीण गावडे कोर्टी,बालाजी वाडेकर, भाऊ मस्तूद, आबा ठोंबरे, बापू महानवर, अभिमन्यू लोकरे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार ठोकडे यांनी सर्व समस्या आणि शंकांचा गंभीरपणे विचार करून नुकसानभरपाई प्रक्रिया अधिक सुलभ व जलद करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती युवा सेना तालुकाप्रमुख फडतरे यांनी दिली.

तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी यावेळी या विषयी माहिती देताना म्हणाल्या की, तालुक्यातील सत्तर टक्के फार्मर आयडीचे काम पुर्ण झाले आहे. नावात चुका, असल्याने मंजूर रक्कम अजून खात्यावर जमा झाल्या नाहीत येत्या पंधरा दिवसांत खात्यावर जमा होतील. फार्मर आयडी प्रक्रिया गतीमान केली जाईल. २०२३-२४ मधील सर्वाधिक शेतकरी कोर्टी मंडलाळील वंचित आहेत त्यासाठी पाठपुरवा सुरू आहे. थकबाकीसाठी बॅंकानी पैसे अडवले असतील तर लेखी तक्रार करा बॅंक मॅनेजर वर गुन्हे दाखल करू.
