केम येथील खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील निमोणीच्या मळ्यातील खंडोबा देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निमित्त सालाबादप्रमाणे येथील खंडेश्वर तरूण मंडळाच्या वतीने जेजुरी येथून ज्योत आणली या ज्योतीचे केम येथे आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले

पालखी शनिवारी सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा गावात आला संपूर्ण पालखी मार्गावर स्वामीणी तळेकर व प्रज्ञा तळेकर या मुलींनी रांगोळी काढली होती. हालगीच्या तालावर पालखीची मिरवणूक गावातून काढली या वेळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी चौकात आल्यानंतर या पालखी समोर वाघ्या-मुरळी भन्नाट असा कार्यक्रम संपन्न झाला या मध्ये एकूण दहा ताफे सहभागी झाले होते. या मध्ये पंढरपूर,मोहोळ, टेंभुर्णी,कंदर,कुर्डू, व केम हे सहभागी तब्बल तीन तास कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी खंडोबा मंदिराकडे रवाना झाली.

खंडोबा मंदिरात आल्यावर रात्रभर जागरण गोंधळ वाघ्या मुरळी चार कार्यक्रम झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती सकाळी सात वाजता केम येथील हरि वाघे यांनी हाताने लंगर तोडला व खंडेरायाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी खंडोबा देवस्थान कमिटी व खंडेश्वर तरूण मंडळ यांनी परिश्रम घेतले


