जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशिवणे येथे बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न -

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशिवणे येथे बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न

0

करमाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशिवणे येथे  “बाल आनंद बाजार” इ १ली ते ४थी च्या विद्यार्थ्याचा भरवण्यात आला होता,  शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावून बाल आनंद मेळावा साजरा केला. कमाई सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञाना बरोबरच, व्यावहारिक, आर्थिक बाबीची जाण व्हावी, समाजाचे ज्ञान मिळावे, बिन भिंतींच्या शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावे, व्यावहार कुशलता कळावी यासाठी जिल्हा परिषद शाळेने खरी कमाई योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी  स्वतः च्या घरून चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थाची विक्री, खरेदी व विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. आनंद मेळाव्याला चिमुकल्या पासून ते अबाल वृद्धांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी आणलेल्या सर्व खाद्य पदार्थाची गावकर्‍यांनी अतिशय उत्साहात खरेदी केल्या यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये  पाणीपुरी, पालेभाज्या, कांदे, बटाटे, नारळ, मॅगी, चहा, सरबत, वडापाव, भजे, पुलाव, चिवडा, पॉपकॉन इ विक्री करण्यासाठी स्टॉल उभे केले होते.

या बाजारातून 21 हजारापेक्षा जास्त विक्रीची उलाढाल झाली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ पूजा रेवन टकले, उपाध्यक्ष गणेश कवडे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन सर्व पालक महिलावर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी नितीन कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक हरिदास मोळीक, मंदाताई खोसे, श्री धनंजय दिरंगे,  यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!