कोशिश करणेवालो की हार कभी नही होती…

लहरोंसे डर कर नौका पार नही होती..
कोशिश करणेवालो की हार कभी नही होती…
अशाच प्रकारे काही व्यक्ती सतत संघर्ष करत असतात.
अशा व्यक्तींचं आयुष्य म्हणजे संघर्षातून घडलेली झेप, झेपेतून जन्मलेली नवी उमेद आणि उमेद टिकवणारा अविरत विश्वास असतो. अशी माणसं पद, प्रतिष्ठा किंवा स्वार्थ यापलीकडे जाऊन समाजासाठी जगत असतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे – आदरणीय सुजित तात्या बागल.
लहानपणापासूनच हरहुन्नरी, कष्टाळू आणि समाजाभिमुख विचारसरणी जपणाऱ्या सुजित तात्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही “मला गावासाठी, तालुक्यासाठी काहीतरी करायचं आहे” हे स्वप्न उराशी बाळगून सामाजिक कार्यात उडी घेतली. माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल (मामा) यांच्यासोबत काम करताना त्यांनी राजकारणापेक्षा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केलं – ग्रंथालय उभारणी, सहकारी संस्था, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून गावा-गावात कामाची पायाभरणी केली.
मामांच्या निधनानंतरही त्यांचा प्रवास थांबला नाही. माजी आमदार शामलताई बागल यांच्यासोबतही काम केले. पुढे त्यांनी वेगळी दिशा स्वीकारली आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत जोडून घेत तालुक्याच्या विकासात सक्रिय योगदान दिलं.विविध निवडणुकीत सहभाग घेतला. कुठं यश तर कुठं अपयश आलं पण धडपड चालूच ठेवली.
आज त्यांच्या कार्याचा आवाका अत्यंत व्यापक आहे.
▪️ मांगी येथील दिग्विजय बागल ग्रंथालय संघाचे संस्थापक व चेअरमन
▪️ तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व संस्थापक
▪️ मांगी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन
▪️ मांगी ग्रामपंचायत सदस्य
▪️ विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेचे सचिव
▪️ तालुक्यातील हमीभाव केंद्र उभारणीचे मार्गदर्शक
▪️ संजय मामा शिंदे मोटर वाहतूक संघाचे चेअरमन
▪️ संजयमामा शिंदे ऊस वाहतूक संघाचे चेअरमन
या सर्व संस्था केवळ नावापुरत्या न ठेवता, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन जोमाने पुढे नेण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. नुकतीच ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरची खरेदी, मका हमीभाव केंद्र, आणि आधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उभारलेली नवी पावलं ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.
या यशस्वी प्रवासात सौ. अश्विनीताई बागल यांची भक्कम साथ ही त्यांच्या शक्तीचा आधारस्तंभ ठरली आहे. तसेच सुपुत्र सुमित व आशुतोष यांनी नोकरीच्या वाटेऐवजी आदर्श शेती व आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून शेतकऱ्यांसाठी नवी दिशा निर्माण केली आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.
आदरणीय तात्या,
राजकारणात पद मिळणं महत्त्वाचं असतं, पण पद मिळाल्यानंतर सातत्याने काम करत राहणं आणि लोकांच्या विश्वासावर टिकून राहणं हेच खऱ्या यशाचं मोजमाप असतं — आणि ते आपण आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे.
आपली सर्व स्वप्नं, धोरणं आणि आकांक्षा या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्णत्वाकडे जावोत, समाजसेवेचा हा प्रवास अधिक व्यापक, अधिक प्रभावी होवो, हीच सदिच्छा.आपले आरोग्य उत्तम राहो, ऊर्जा, उत्साह व समाजसेवेची जिद्द सदैव अशीच कायम राहो! 🙏
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌸 नवीन वर्षासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला- डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9423337480
