कथालेखन स्पर्धेत रत्नमाला होरणे यशस्वी-राज्यस्तरावर निवड

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा ता.३१: या वर्षात शिक्षक व अधिकारी अंतर्गत आयोजित कथालेखन स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा भांगेवस्ती ( कंदर ) येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रत्नमाला दत्तात्रय होरणे यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट कथालेखनाची दखल घेत विभागीय स्तरावर त्यांची निवड करण्यात आली.

विभागीय स्पर्धेत पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमधून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये श्रीमती होरणे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अग्रक्रम मिळवला. या यशाच्या जोरावर त्यांची राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय विनोबा ॲप या शैक्षणिक ॲपवरील शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीतही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उपक्रमात त्यांनी प्रबोधनात्मक व दर्जेदार व्हिडीओ सादर करत तालुकास्तरावर दोन वेळा प्रथम क्रमांक तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय व शिक्षकप्रिय अशी ओळख असलेल्या श्रीमती रत्नमाला होरणे यांना यापूर्वीही विविध शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कथालेखन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल गटविकास अधिकारी अमित कदम,
, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम विस्तार अधिकारी जयवंत नलवडे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे


