केम गावातील पन्नास वर्षीय नागरिक बेपत्ता; पोलिसांकडून माहितीचे आवाहन

केम(संजय जाधव) : दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता केम येथील चांगदेव दत्तात्रय तळेकर (वय ५०) हे एका दहाव्याच्या कार्यक्रमाला जाण्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते अद्याप देखील घरी परतले नसून त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी त्यांचा मुलगा उत्तरेश्वर चांगदेव तळेकर यांनी करमाळा पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

बेपत्ता चांगदेव तळेकर यांच्या अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, विटकरी रंगाची पँट असून त्यांचा रंग सावळा आहे. त्यांची उंची सुमारे ५ फूट ६ इंच आहे.
या घटनेचा तपास करमाळा पोलीस करत असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणास माहिती असल्यास करमाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कुणाला आढळून आल्यास 9834079225/8010387548 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तळेकर परिवाराने आवाहन केले आहे.



