करमाळ्यात पत्रकारांसाठी लवकरच स्वतंत्र पत्रकार भवन उभारणार – सुनील सावंत

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.६: करमाळा शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात येईल, असे आश्वासन शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी दिले.

पत्रकार दिनानिमित्त शहर विकास आघाडीच्या वतीने पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना श्री. सावंत यांनी हे आश्वासन दिले. यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अॅड. बाबुराव हिरडे, विवेकराव येवले, नाशिक कबीर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील सावंत म्हणाले की, करमाळ्यातील पत्रकारांची कार्यपद्धती इतर ठिकाणच्या पत्रकारांपेक्षा अतिशय सकारात्मक आणि जबाबदार आहे. पत्रकारांनी केलेल्या वस्तुनिष्ठ व परखड पत्रकारितेमुळेच आम्हाला निवडणुकीत यश मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे म्हणाले, की
पत्रकारांचा सत्कार होतो की टीका होते, याकडे न पाहता समाजात आरशासारखी भूमिका बजावणे हे पत्रकारांचे खरे कर्तव्य आहे. वस्तुस्थिती निर्भीडपणे समाजासमोर मांडणे महत्त्वाचे असून त्याचे परिणाम काय होतील याची चिंता न करता पत्रकारांनी सत्याची बाजू मांडावी, पत्रकार हा समाज परिवर्तनसाठी मध्यस्थ असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा कार्यकर्ता आहे,असेही मत ॲड. हिरडे त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात नाशीर कबीर,ज्येष्ठ पत्रकार विवेकराव येवले तसेच आदिनाथ चे संचालक ॲड. राहुल सावंत यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष प्रतिनिधी व नगरसेवक संजय सावंत यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ कांबळे यांनी केले.

यावेळी नगरसेवक रवी जाधव,अमोल परदेशी, सुनील लुणीया, दादासाहेब इंदलकर यांचेसह पत्रकार प्रफुल्ल दामोदरे, आयुब शेख सचिन झव्हेरी, अश्फाक सय्यद,विशाल घोलप, अलीम शेख, विशाल परदेशी, अशोक मुरूमकर, राजेश गायकवाड शेखर स्वामी, दिनेश मडके, शंभुराजे फरतडे,श्री. चौगुले, नागेश चेंडगे, शितलकुमार मोटे, विजय देशपांडे ,सागर सामसे बापू उबाळे बापू मोरे पांडुरंग सावंत यांच्यासह करमाळा शहरातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
