भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

करमाळा(संदेश प्रतिनिधी): भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व्यवहारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्यसहित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात भारत प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या असून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी विद्यार्थिनींनी भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच शिक्षकांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. महिलांच्या शिक्षणाची खरी सुरुवात सावित्रीबाई फुले यांनीच केली, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमास भारत प्रायमरी स्कूलमधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


