शेळके वस्ती, दहिगाव येथील शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

करमाळा : करमाळा तालुक्यातील शेळके वस्ती, दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिगाव सोसायटीच्या माजी चेअरमन अनुराधा शेळके होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून दहिगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका गलांडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमास शेळके वस्तीवरील माता, किशोरवयीन मुली, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी अंकिता पाडुळे, तनुज पोरे, ज्ञानेश्वरी पाडुळे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व विशद केले. काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

महिला व मुलींसाठी संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतीराम पाडुळे व उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन उर्मिला गंभीरे यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा शेंडगे, स्वाती शेळके, उज्वला गलांडे, मेघा शेळके, अनिता जाधव, अश्विनी वाघमोडे, सीमा पाडुळे, दिपाली पाडुळे, वैजयंती शेळके, साधना पाडुळे, सुषमा जाधव, सुवर्णा पाडुळे, शीतल वाघमोडे, मनीषा कोंडलकर यांच्यासह अंगणवाडी सेविका मोटे व शिंदे उपस्थित होत्या.

