पांगरे येथे मोटारसायकल चोरी

करमाळा /संदेश प्रतिनिधी,
करमाळा, ता.९:पांगरे येथे घरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पांगरे येथील विवेक व्यंकटराव सरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , दि. ३० डिसेंबर २०२५ सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी होंडा कंपनीची युनीकॉर्न मॉडेलची (क्रमांक MH-45-AJ-2723) मोटारसायकल घरासमोरील पटांगणात लावली होती.

दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल त्या ठिकाणी दिसून न आल्याने परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मोटारसायकल मिळून आली नाही. त्यानंतर पांगरे, कविटगाव शिवार तसेच करमाळा परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल सापडली नसल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेल्याची खात्री झाली आहे.
अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची सदर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली .या प्रकरणी करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


