उजनी जलाशयात मत्स्य बोटुकली संचयनासाठी ६० लाखांचा निधी मंजूर; माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश -

उजनी जलाशयात मत्स्य बोटुकली संचयनासाठी ६० लाखांचा निधी मंजूर; माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

0

करमाळा: जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार उजनी जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन करणे या कामासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. ‌याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे आपण मे २०२५ मध्ये उजनी जलाशयामध्ये बोटुकली संचयन करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष निधीची मागणी केलेली होती त्या मागणीस यश आले असून ६० लक्ष निधी बोटुकली संचयनासाठी मंजूर झाला आहे.

ना. गोरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये माजी आमदार शिंदे यांनी म्हटले होते की,उजनी जलाशय हे राज्यात मत्स्य व्यवसायासाठी अग्रेसर असणारे जलाशय आहे. मासेमारीचे हक्क मत्स्य विभागाकडे नसून ते जलसंपदा विभागाकडे आहेत. उजनी जलाशयाचे अधिकार सोलापूर जिल्ह्याकडे आहेत. उजनी जलाशयावर सर्व जातीधर्माचे लोक मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू जलसंपदा विभागाकडे मत्स्यबीज संचयनासाठी आर्थिक तरतुद नसल्याने मागील २७ ते २८ वर्षे पासून उजनी जलाशयामध्ये मत्स्यबीज संचयन झालेले नाही.

त्यामुळे मत्स्यबीज संचयन न झाल्याने जलाशयामध्ये कार्प जातीचे मासेच शिल्लक राहिले नाहीत. उजनी जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडणेसाठी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने मागणी केलेली आहे. तरी उजनी जलाशयाच्या सिंचन क्षमतेनुसार मत्स्यबीज संचयन खरेदी करणेसाठी १.५० कोटी निधी मंजूर करणेत यावा अशी विनंती केली होती.

सदर मागणीस यश आले असून उजनी जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचन करण्यासाठी ६० लक्ष व बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पामध्ये मत्स्यबोटूकली संचयनासाठी ६० लक्ष निधी मंजूर झाला आहे.यापूर्वीही २०१९ ते २४ या कालावधीत आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमधून २ कोटी निधी मत्स्यबोटूकली संचनासाठी मंजूर झालेला होता. आता माजी आमदार असताना सुद्धा संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून ६० लक्ष निधी मत्स्यबोटुकली संचयनासाठी उपलब्ध झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!