सावित्री-फातिमा गुणगौरव पुरस्कारासाठी करमाळा तालुक्यातील गुणवंतांची निवड जाहीर

केम(संजय जाधव): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, निष्ठावान व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळांच्या सन्मानार्थ देण्यात येणाऱ्या सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार २०२६ साठी करमाळा तालुक्यातील गुणवंतांची निवड जाहीर करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील जगदीशश्री लॉन्स अँड हॉल येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यासाठी माजी शिक्षक आमदार व शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. कपिल पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार असून, शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

करमाळा तालुक्यातील पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :
🔹 आदर्श शाळा –
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर
(मुख्याध्यापक – श्री. कोळेकर सर)
🔹 आदर्श शिक्षक –
श्री. हरी विनायक शिंदे,
शरदचंद्रजी पवार विद्यालय, वाशिंबे
🔹 आदर्श कला शिक्षक –
श्री. रफिक खलील खान,
महात्मा गांधी विद्यालय, करमाळा
🔹 आदर्श लिपिक –
श्री. एकनाथ कोंडीबा तानवडे,
त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी
🔹 आदर्श सेवक –
श्रीमती सविता हंबीराव लोकरे,
लाल बहादूर शास्त्री विद्यालय, सालसे

या निवडीबद्दल शिक्षक भारती करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले आहे. तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड, कार्याध्यक्ष किशोर जाधवर, सचिव सचिन गाडेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष इरफान काझी, उपाध्यक्ष गोरख ढेरे व नितीनकुमार कांबळे, खजिनदार मारुती साखरे, सहसचिव सुजित झांजुर्णे, प्रसिद्धीप्रमुख बाळकृष्ण गायकवाड, शिक्षकेतर आघाडी प्रमुख सागरराजे देशमुख, महिला आघाडी प्रमुख स्वाती माने मॅडम, तसेच तालुका संघटक किशोर काळे व सागर गवळी यांनी निवड झालेल्या सर्व गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणा, निष्ठा व गुणवत्तेची कास धरून कार्य करणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने हा गुणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे व आयोजकांनी केले आहे.

