चिखलठाणच्या माजी सरपंच रुक्मिणी नेमाने यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ,ता.१६: चिखलठाण येथील माजी सरपंच श्रीमती रुक्मिणी बाबा नेमाने (वय ९०) यांचे काल गुरूवार, दि. १५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने चिखलठाण गावावर शोककळा पसरली आहे

श्रीमती रुक्मिणी नेमाने या चिखलठाण ग्रामपंचायतीच्या सन २००७ ते २०१२ या कालावधीत सरपंच म्हणून कार्यरत होत्या. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण केला होता. त्या विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या समर्थक परिवारातील एक महत्त्वाचा घटक म्हणूनही ओळखल्या जात होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बापू नेमाने, बबन नेमाने व सुखदेव नेमाने यांच्या त्या मातोश्री होत.



त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी करमाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
