शिवकिर्ती इंग्लिश मीडियम स्कूल, केम येथे बाल आनंदी बाजार व हळदीकुंकू समारंभ उत्साहात

केम(संजय जाधव):केम येथील शिवकिर्ती इंग्लिश मीडियम स्कूल येथे शुक्रवार, दि. १६ जानेवारी रोजी बाल आनंदी बाजार व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळेमार्फत विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, श्री पांडुरंग परमात्मा व माता रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज कदम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी इयत्ता नर्सरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी फळे, भाज्या, शालेय साहित्य, भाजीपाल्याची रोपे, भेळ, वडापाव, पाणीपुरी आदींची सुमारे ९७ दुकाने थाटली होती. या बाल आनंदी बाजारातून सुमारे २२ हजार ३७० रुपयांची उलाढाल झाली.
भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा मानला जाणारा हळदीकुंकू समारंभही यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी उखाणे घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

संस्थेचे सचिव सुहास काळे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापक मधुकर काळे, नगराबाई काळे, गंगाराम दुधे, शिक्षणप्रेमी हरिभाऊ गरड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. सर्व पालकांनी खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.


