शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिनानिमित्त विशेष पुरस्कार वितरण सोहळा आयोजित

करमाळा (प्रतिनिधी): शहीद मेजर अमोल अरविंद निलंगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती, साडे ता. करमाळा जि. सोलापूर यांच्या वतीने शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी भारतीय सेनेचे अधिकारी कर्नल केदार भिडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गणेश करे-पाटील, संस्थापक/अध्यक्ष, यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे हे असणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. प्रचिती अक्षय पुंडे मॅडम (संस्थापक व संचालिका, प्रोलक्स वेलनेस अॅण्ड प्रोडक्शन प्रा. लि., पुणे), मा. डॉ. अॅड. बाबुराव हिरडे (अध्यक्ष, ग्रामसुधार समिती करमाळा), मा. श्री. अक्रूर शंकरराव शिंदे (तालुका अध्यक्ष, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा) तसेच मा. श्री. बाळकृष्ण लावंड (अध्यक्ष, सोलापूर जिल्हा इंग्रजी लँग्वेज असोसिएशन) उपस्थित राहणार आहेत.

खालील मान्यवरांचा शहीद स्मृती विशेष पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.
- रणजित नारायणराव माने (पोलीस निरीक्षक, करमाळा), श्रीमती शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार, करमाळा),
- गुलाबराव भिमराव देवकते (ग्रामीण भागातील सामान्य नागरिक सेवा),
- प्रा. कल्याणराव लक्ष्मणराव साळुंके (प्रसिद्ध पक्षी अभ्यासक,करमाळा ),
- संभाजी सर्जेराव भोसले (प्रगतशील बागायतदार),
- किरण ढेरे पाटील (आदर्श सैनिक)
- सचिन शिंदे (आदर्श कला शिक्षक)
- तसेच उपक्रमशील शाळा म्हणून पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं. १,
- नगरपरिषद करमाळा, जि. सोलापूर या शाळेचा विशेष सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ग्रामस्थ साडे, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा तालुका आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता व सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. गणेश करे-पाटील व मा. श्री. अक्रूर शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे स्थळ स्मृती स्थळ, साडे निलंगे मळा, जेऊर–साडे रोड, सह्याद्री डेअरी जवळ, ता. करमाळा जि. सोलापूर असे आहे.

