स्वाती जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान -

स्वाती जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१७: करमाळा येथील रहिवासी असलेल्या व सध्या रतडगाव (ता. जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. स्वाती सदाशिव जाधव यांनी शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी  प्राप्त केली आहे.सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  विद्यापीठाअंतर्गत “अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक व शैक्षणिक समस्यांचा अभ्यास” या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या  विषयावर त्यांनी आपला प्रबंध यशस्वीपणे सादर केला.

त्यांचा एस.एल. जाधव (सध्या करमाळा न्यायालयात  वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असणारे)  यांच्या बरोबर विवाह झाल्यानंतरही त्यांनी शिक्षण चालूच ठेवले. त्यांनी डी.एड्. पूर्ण केले. जिल्हा परिषद सेवेत प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतरही शिक्षणाची ओढ न थांबवता जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी बी.ए. (इंग्रजी), एम.ए. (इतिहास), एम.ए. (शिक्षणशास्त्र), बी.एड्., डी.एस.एम. तसेच शिक्षणशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या संशोधनात्मक लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळून अनेक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देताना स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता सातत्याने उंचावत राहणे, हीच त्यांच्या कार्याची ओळख ठरली आहे. त्यांना पीएच. डी. प्राप्त झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, कुलसचिव डॉ. लकडे यांच्यासह प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, प्रा. डॉ. माहेश्वर कळलावे, प्रा. डॉ. विद्युलता पांढरे, प्रा. डॉ. शीला स्वामी, प्रा. डॉ. नदाफ, प्रा. डॉ. वीरभद्र दंडे, प्रा. डॉ. जी. डी. बिराजदार, प्रा. डॉ. मेहेरजबीन वडवान, ग्राम सुधार समिती करमाळा
तसेच अहिल्यानगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विधिज्ञ विनोद गायकवाड (अतिरिक्त स्थायी सल्लागार, भारत सरकार) यांच्यासह शिक्षकवर्ग व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.विशेष म्हणजे त्यांचा मुलगा प्रणव जाधव, विधी शाखेमध्ये ILS लॉ कॉलेज, पुणे येथे तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. तर मुलगी प्रणाली जाधव,  दहावी इयत्तेमध्ये   लीड स्कूल करमाळा येथे शिक्षण घेत आहे. या दोघांनी आई चे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!