शोभा लोंढे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

केम(संजय जाधव) : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था, बाळे (सोलापूर) यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५–२६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार राजाभाऊ तळेकर विद्यालयातील शिक्षिका शोभा महादेव लोंढे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १८ जानेवारी) पंढरपूर येथील सिंहगड संस्थेच्या प्रांगणात पार पडला.

कार्यक्रमास शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत तसेच पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या ३५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सौ. लोंढे यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


