स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे ‘अविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा : करमाळा येथील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘अविष्कार २०२५-२६’ उत्साही वातावरणात पार पडले. शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, पारंपरिक व लोकगीते तसेच मराठी-हिंदी चित्रपट गीतांवर बहारदार नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, सचिव व मुख्याध्यापिका धनश्री दळवी, संचालक रामचंद्र दळवी, द्रौपती वाघमारे, सुमन दळवी, सुलोचना दळवी, प्रियांका गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, नगरसेविका ज्योत्सना लुनिया व साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका शिवांगी कांबळे, अश्विनी पाटील, रोहिणी गरड, सुनंदा दुधे, आशा पाटणे, पूजा पाटील, अश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, आसिफ मणेरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन आशा पाटणे यांनी केले, तर आभार संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी मानले.

