श्रीदेवीचामाळ येथील मनोहर सोरटे-पाटील यांचे निधन

करमाळा:श्रीदेवीचामाळ येथील गोरक्षनाथ उर्फ मनोहर (आबा) सोरटे पाटील (वय ८३) यांचे १८ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने श्रीदेवीचामाळ गावावर शोककळा पसरली आहे.
मनोहर सोरटे हे करमाळा येथील एस.टी. डेपोमधून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. करमाळा येथील संगोबारोड येथील डी. जी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आदर्श वडील म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व नातवंड असा मोठा परिवार आहे. अशोक, दिनेश व महेश पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी करमाळा पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



