करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सबस्टेशन बदलाची नगराध्यक्षांनी केली मागणी -

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सबस्टेशन बदलाची नगराध्यक्षांनी केली मागणी

0

करमाळा(दि.२२): करमाळा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपिंग स्टेशनसाठी जेऊर सब स्टेशनवऐवजी दहीगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा मिळावा, यासाठी करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांना पत्र दिले आहे.


दहिगाव येथील पंपिंग स्टेशनला जेऊर सब स्टेशनवरून वीजपुरवठा केला जात असून, नैसर्गिक आपत्ती व तांत्रिक कारणांमुळे वारंवार वीजखंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून, नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी येत आहेत.


या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे दहिगाव सब स्टेशन येथून करमाळा शहराच्या पाणीपुरवठा पंपिंग स्टेशनसाठी तात्काळ आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शहरवासीयांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!