मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींसह विधवा महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम-नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांचा आदर्श उपक्रम

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२६: मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने सुवासिनी महिलांसोबतच विधवा महिलांनाही सन्मानपूर्वक हळदी-कुंकू देत समाजात समानतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे उपस्थित महिलांमध्ये समाधान, आनंद व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हळदी-कुंकू कार्यक्रम प्रामुख्याने सुवासिनी महिलांसाठी मर्यादित असतात; मात्र विधवा महिलांनाही सण-उत्सवांच्या आनंदात सहभागी करून घेणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांनी घेतलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असून समाजाला नवी दिशा देणारा आहे.”

या वेळी विधवा महिला भगिनी शकुंतला जाधव यांच्यासह उपस्थित सर्व विधवा भगिनींना हळदी-कुंकूचा मान देऊन पुष्पगुच्छाने सन्मानित करण्यात आले. तसेच वाण म्हणून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, सौ. कोमल घुमरे, प्रियांका बागल, नगरसेविका सौ. चैताली सावंत यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. यामध्ये सौ. निमा फंड, सौ. लता घोलप, सौ. साधना घोलप, सौ. सिंधू घोलप, सौ. तृप्ती घोलप, मांडवे मॅडम, कानडे मॅडम, योगिता बुलबुले, सौ. योगिता लोकरे, सौ. सुनीता शिगची, अनुराधा शिगची, सौ. रचना लुंकड, सौ. वैशाली शियाळ, अनिता किरवे यांचा समावेश होता.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. उर्मिला जाधव, डॉ. मंजिरी नेटके, डॉ. सारिका लोकरे, डॉ. योगिता पवार, डॉ. निशा सारंगकर, डॉ. वैशाली घोलप, डॉ. वैशाली कुलकर्णी, डॉ. अर्पणा भोसले, डॉ. मोहिनी वीर यांचीही उपस्थिती होती.
यासह सौ. अर्चना फंड, सौ. शीतल फंड, रोहिणी फंड, सौ. कोमल चांदगुडे, सौ. कोमल फंड, सौ. मीरा फंड, सौ. भाग्यश्री फंड, सौ. मयुरी फंड, सौ. मीना फंड, सौ. अलका फंड, सौ. अर्चना अंकुशखाने, प्रेमा अग्रवाल, सौ. सिंधू पवार, सौ. शोभा इंदलकर, साने मॅडम, सौ. संध्या कट्टिमणी, सौ. संध्या काळे, अश्विनी टांगडे, सौ. चंद्रकला क्षीरसागर, सौ. संगीत क्षीरसागर, सौ. अश्विनी वीर, सौ. लता वीर, सौ. मोहिनी वीर, मोनिका चौधरी, सौ. मनिषा मोरे, सौ. अक्षरा चाळक, सौ. अक्षरा दळवी, अमृता फंड, सुवर्णा मडके, अंबिका सूर्यवंशी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक एकात्मता वाढत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक सौ. स्वातीताई फंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!