पंचायत समिती निवडणुकीत १२ जागेसाठी ४२ जण रिंगणात तर जिल्हा परिषदेच्या ६ जागेसाठी २० जण रिंगणात -

पंचायत समिती निवडणुकीत १२ जागेसाठी ४२ जण रिंगणात तर जिल्हा परिषदेच्या ६ जागेसाठी २० जण रिंगणात

0

करमाळा, ता.२७: करमाळा जि.प. पं. स.  निवडणुकीतील चित्र  आज(ता.२७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. यामध्ये पंचायत समितीच्या १४९ उमेदवारापैकी १०७ जणांनी माघार घेतली असून १२ जागेसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर जिल्हा परिषद निवडणुकीत ५५ उमेदवारापैकी ३५ जणांनी माघार घेतली असून ६ जागेसाठी २० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

पंचायत समितीमध्ये जेऊर, उमरड, चिखलठाण येथे दुरंगी तर कोर्टी येथे अष्टरंगी सर्वात जास्त उमेदवार उभे आहेत. वांगी ,रावगाव तिरंगी, साडे केत्तूर चौरंगी ,पांडे पंचरंगी, तर हिसरे सहा रंगी अशी ही निवडणूक होत आहे ही निवडणूक प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती म्हणजेच बागल व संजय मामा शिंदे यांची युतीविरुद्ध करमाळा तालुका विकास आघाडी म्हणजे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गट यासह शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासप, काही अपक्ष काही ठिकाणी काँग्रेस असे वेगवेगळे उमेदवार उभे असलेले चित्र दिसून येत आहे.

यामध्ये केम पंचायत समिती गणामध्ये चौरंगी लढत होत आहे त्यात महादेव भैरू तळेकर भाजपा कमळ, अमरजीत दिगंबर साळुंखे शरद पवार गट तुतारी, ज्ञानेश्वर भाऊसाहेब बिचतकर करमाळा तालुका विकास आघाडी सिटी, अशोक ज्ञानदेव वाघमोडे अपक्ष सफरचंद ,

कोर्टी पंचायत समिती गणामध्ये आठ रंगी लढत होत आहे. यामध्ये नाना प्रकाश झाकणे भाजपा कमळ, अमोल दादासाहेब दुरंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष तुतारी ,नानासाहेब नरहरी साखरे शिवसेना धनुष्यबाण, रमेश अशोक चव्हाण वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर, संजय कुमार सौदागर जाधव करमाळा तालुका विकास आघाडी सिटी ,मोहम्मद जमीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष कपाट, स्वप्नील विठ्ठल जाधव अपक्ष सफरचंद तर संभाजी श्रीमंत शिंदे अपक्ष नारळ असे आठ उमेदवार आहेत.

केतुर पंचायत समिती गणामध्ये संतोष मच्छिंद्र वारगड शिवसेना धनुष्यबाण ,ॲड. आजिनाथ सर्जेराव विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, विलास भगवान कोकणे करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी तर मोहम्मद जमीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष कपाट ,या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे.

रावगाव पंचायत समिती गणामध्ये तिरंगी लढत होत आहे यामध्ये दिपाली गणेश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुतारी, संध्या महावीर कांबळे भाजपा कमळ, साळुबाई अंगद लांडगे करमाळा तालुका विकास आघाडी शेट्टी .

पांडे पंचायत समिती गणामध्ये शिवाजी दिलीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी, प्रदीप रघुनाथ बनसोडे शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण ,आप्पा वाल्मिक भोसले भाजपा कमळ  स्वप्निल धनंजय काळे करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी तर युवराज पांडुरंग भोसले अपक्ष नारळ हे उभे आहेत.

वांगी पंचायत समिती गणामध्ये सोनाली नितीन तकीक भाजपा कमळ ,नागर भीमराव कांबळे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर, द्वारका दत्तात्रय रणसिंग करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी.

साडे पंचायत समिती गणामध्ये दशरथ भगवान गाडगे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, धनंजय बळवंतराव पाटील शिवसेना धनुष्यबाण, देवराव गेना सुकळे काँग्रेस हाताचा पंजा, नितीन उद्धव सपकाळ करमाळा तालुका विकास आघाडी सिटी असे उमेदवार उभे आहेत.

हिसरे गणामध्ये भरत विठ्ठल अवताडे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, गौतम उद्धव रोडे शिवसेना शिंदे धनुष्यबाण, कृती ज्योतीराम लावंड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी ,दत्तात्रेय उत्तरेश्वर जगदाळे करमाळा तालुका विकास आघाडी सिटी, आनंद विश्वनाथ देवकते राष्ट्रीय समाज पक्ष रिक्षा तर समाधान शाहूराव फरतडे अपक्ष छत्री.

वीट पंचायत समिती गणामध्ये पूजा राहुल कानगुडे शिवसेना धनुष्यबाण, पूजा सचिन ढेरे भाजपा कमळ तर मंगल सुभाष जाधव करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी. चिखलठाण या गणामध्ये दुरंगी वनमाला  चंद्रकांत सरडे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ ,लताबाई नारायण गव्हाणे करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी,

जेऊर पंचायत समिती गणामध्ये उर्मिला राहुल लबडे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ तर ललिता धनंजय शिरसकर करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी असे उमेदवार या पंचायत समिती गणामध्ये लढतीला उभे आहेत.

उमरड पंचायत समिती गण सोनाली शरद देवकर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आदिती अतुल पाटील करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी.

जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये  निवडणूक होत आहे. यामध्ये वांगी कोर्टी दुरंगी,केम तिरंगी,पांडे वीट चौरंगी तर चिखलठाण मध्ये पंचरंगी लढत होत आहे.

यामध्ये चिखलठाण गट हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी असल्यामुळे या ठिकाणी पाच उमेदवार उभे आहेत यामध्ये प्रशांत हनुमंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, अशोक ज्ञानदेव वाघमोडे काँग्रेस  हाताचा पंजा, अजिंक्य भाऊसाहेब सरडे शिवसेना धनुष्यबाण  करमाळा तालुका विकास आघाडीचु प्रमोद वामनराव बदे  शिट्टी, जालिंदर वाल्मीक कांबळे अपक्ष गॅस सिलेंडर.

वांगी जिल्हा परिषद गटामध्ये मीनाक्षी निळकंठ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, रूपाली ज्ञानेश्वर गोडसे करमाळा तालुका विकासासाठी शिट्टी,

केम जिल्हा परिषद गटामध्ये मालती संजय देवकर भाजपा कमळ ,साधना अण्णासाहेब पवार शिवसेना धनुष्यबाण तर कल्याणी अजित तळेकर करमाळा तालुका विकासाकडे शिट्टी अशी लढत होत आहे .

पांडे जिल्हा परिषद गटामध्ये रश्मी दिगंबरराव बागल भाजपा कमळ, राणी संतोष वारे शरद पवार गट तुतारी गुणाबाई विष्णू रंधवे राष्ट्रीय समाज पक्ष रिक्षा, तर ज्योती राहुल सावंत करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी.

वीट जिल्हा परिषद गटामध्ये अश्विनी गणेश चिवटे भाजपा कमळ, सुषमा दादासाहेब तनपुरे शिवसेना धनुष्यबाण ,रत्नमाला राजेंद्रसिंह राजे भोसले करमाळा तालुका विकास आघाडी शिट्टी तर दिपाली अशोक वाघमोडे अपक्ष सफरचंद.

कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये दुरंगी लढतीत वनिता सुभाष गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ  तर योगिनी नितीन राजेभोसले करमाळा विकास आघाडी शिट्टी.

अशा या जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा गाणांमध्ये लढती होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे उद्यापासून हे सर्व उमेदवार आपल्या चिन्हाचे प्रचाराला लागलेली दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!