प्रशासनावर वचक असलेले नेतृत्वास महाराष्ट्र मुकला : माजी आमदार जयवंतराव जगताप

0
संग्रहित छायाचित्र

करमाळा:अजितदादांच्या निधनाने प्रशासनावर ठाम वचक ठेवणारे, कार्यकर्त्यांना बळ देणारे आणि सहकार तसेच राजकारणात प्रभावी नेतृत्व करणारे एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने गमावले आहे, अशा शब्दांत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, अजितदादांच्या दुर्दैवी निधनाची धक्कादायक वार्ता कळताच मन अत्यंत व्यथित झाले. अजित दादा आणि मी जवळपास समवयस्क असून आमचे मैत्रीचे व अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आमचा राजकारणातील प्रवेशही जवळपास एकाच काळात झाला. मी १९९० साली विधानसभेवर, तर अजित दादा १९९१ साली लोकसभेवर निवडून आलो. त्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी, जयंत पाटील, सुभाष कुल यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते कार्यरत होतो.
महाराष्ट्र सरकार असो, राज्य सहकारी बँक असो किंवा एकूणच सहकार क्षेत्र, सर्वत्र अजित दादांचा प्रचंड दरारा आणि प्रशासनावर ठाम वचक होता. कार्यकर्त्यांना बळ देणारे, त्यांना आत्मविश्वास देणारे अजित दादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे कठीण आहे.


मी दोन वेळा आमदार असताना, तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आणि आदिनाथ साखर कारखान्याचा अध्यक्ष असताना, शिखर बँकेच्या माध्यमातून अजित दादांनी केलेली मोलाची मदत करमाळा तालुक्याची जनता कधीही विसरणार नाही.
पवार कुटुंबीयांच्या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी आहे. करमाळा तालुक्याच्या व जगताप कुटुंबीयांच्या वतीने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती व सद्गती देवो, हीच प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!