राज्यस्तरीय बुशू स्पर्धेत अर्णव भोसले व सार्थक सुरवसे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

केम(संजय जाधव) : इंडिया बुशू असोसिएशन यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुशू असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथील येरवडा येथे झालेल्या राज्यस्तरीय बुशू स्पर्धेत केम येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत अर्णव भोसले याने उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले, तर सार्थक सुरवसे याने रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) मिळवले. या कामगिरीच्या जोरावर दोन्ही विद्यार्थ्यांची आगामी राष्ट्रीय बुशू स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक पांडुरंग गोडसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल राजेंद्र सुरवसे, जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर, पत्रकार संजय जाधव, दिलीप देवकर, नागनाथ जाधव, दत्तात्रय टांगडे, बागायतदार उत्तरेश्वर तळेकर, आदिनाथ जाधव गुरूजी, केमेश्वर सुरवसे, बंडू टांगडे आदींनी अभिनंदन केले.या यशामुळे केम परिसरात क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


