शेटफळ येथे  शेतकरी मेळावा संपन्न-आधुनिक शेती, निर्यात व बँकिंग सुविधांवर मार्गदर्शन -

शेटफळ येथे  शेतकरी मेळावा संपन्न-आधुनिक शेती, निर्यात व बँकिंग सुविधांवर मार्गदर्शन

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२५: तालुक्यातील शेटफळ (ना.) येथील वैभव वसंतराव पोळ यांच्या नागराज मशिनरी शेती मॉलच्या वर्धापन दिनानिमित्त माल व लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने मंगळवार दि. २४ रोजी शेटफळ येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कृषीतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शनाचा लाभ झाला.

कार्यक्रमास विभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा (IPS), उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. बाबुराव हिरडे, युनियन बँक क्षेत्रीय कार्यालय, अहिल्यानगरचे क्षेत्र प्रमुख सुनीलकुमार यादव, नव नियुक्त उपविभागीय कृषी अधिकारी प्रतीक्षा शिंदे-कवडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, जैन इरिगेशन सोलापूरचे कृषीतज्ज्ञ किरण पाटील, कंदर येथील के. डी. एक्सपोर्टचे किरण डोके, शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे, तसेच यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन, बदलती पीक पद्धती, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतमाल निर्यातीतील संधी, तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. इच्छित पिकासाठी आवश्यक मशागत, जलसिंचनाचे नियोजन, खते व फुल-फळ नियोजन, संभाव्य रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, निर्यातक्षम फळांची योग्य प्रतवारी आणि देश-विदेशातील बाजारपेठांची माहिती यावरही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
बँकिंग सुविधा, पीक कर्ज, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका यावर विशेष मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी संघटितपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नविनियुक्त पंचायत समिती सदस्य तथा प्रगतशील महिला शेतकरी सोनाली तोडक यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीकामातील सुलभता, मजुरांच्या कमतरतेवरील पर्याय आणि महिलांचे शेतीतील महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले.
या मेळाव्यास तालुक्यातील आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड अमर अडसूळ सुप्रिया शेलार , कैलास लबडे,किरण पोळ, मुरलीधर पोळ नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, विष्णू पोळ,सुहास पोळ अतुल गोडगे, भाऊसाहेब सरडे दिगंबर साळूंके, नंदकिशोर वलटे श्रीकांत साखरे, निलेश दुरंदे अंगद पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित  होते. यावेळी
सौ.सुषमा व संतोष संभाजी चव्हाण सौ.अश्विनी व  श्रीकृष्ण ज्ञानदेव गोडगे,सौ.जयश्री व मल्हारी किसन दुरंदे,सौ.अर्चना व रविंद्र दत्तात्रय देवकर ,सौ.नगीना व ब्रम्हदेव चंद्रकांत पोळ,सौ.मनिषा व संतोष चंद्रहार कदम ,सौ.छाया व रामदास काशिनाथ बिचितकर, सौ.मनिषा व भारत  मुरलीधर आडसुळ सौ.रूपाली व राहूल  तात्याराम मोरे, उज्ज्वला व बापूराव औदुंबर रोकडे, या शेतकऱ्यांचा व मंडल कृषी अधिकारी मधुकर दत्तू मारकड यांचा लोकविकास कृषी गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर व पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले. स्वागत वैभव पोळ ,किरण पोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन जान्हवी पोळ यांनी मानले.
सुयोग्य नियोजन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे हा मेळावा शेतकरी बांधवाना आवडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!