शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ मार्चला रक्तदान शिबिर व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन -

शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ मार्चला रक्तदान शिबिर व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२६:  शहीद जवान नवनाथ गात यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त वरकुटे ( ता.करमाळा)येथे  रक्तदान शिबिर व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन शहीद जवान नवनाथ गात स्मारक समिती  व  आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे वितरण आमदार नारायण आबा पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.डॉ. बाबुराव हिरडे हे राहणार आहेत.

या कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी नऊ वाजता ह भ प गणेश महाराज बारगे यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर दहा वाजता  उपजिल्हाधिकारी अनिल दवंडे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, कॅप्टन रावसाहेब साळुंखे रिटा यांना शौर्य पुरस्कार ,आदर्श शाळेचा पुरस्कार आदलिंग वस्ती कोंढेज, कृषी पुरस्कार करमाळा ऑरगॅनिक ग्रुप यांना व क्रीडा पुरस्कार शिवम अण्णासाहेब ढाणे कुमार महाराष्ट्र केसरी 2025 यांना देण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल-कोलते ,तहसीलदार शिल्पाताई ठोकडे ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत दत्तकाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे-पाटील लक्ष्मणराव पवार विद्यालयाचे प्राचार्य योगेश दळवे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अजितदादा तळेकर तसेच अण्णासाहेब ढाणे, नगरसेवक संजय दादा टोणपे ,आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे ,योध्दा करिअर अकॅडमी चे कॅप्टन विलास नाईक नवरे ,पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे पंचायत समिती सदस्य दशरथ घाडगे सरपंच चिंचाळाचे अशोक पोकळे बजरंग बली संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष किरण भगत, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देविदास ताकमोगे, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे बाळकृष्ण लावंड उद्योजक महादेव जाधव ,  सुभेदार सचिन पवार तसेच सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत आदी जण यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कीर्तन, रक्तदान शिबिर ,सामाजिक पुरस्कार  व त्यानंतर महाप्रसाद अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष सचिव व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!