अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी सहशिक्षकावर गुन्हा दाखल..

0


करमाळा / संदेश प्रतिनीधी
करमाळा,ता.२६ : करमाळा तालुक्यातील वीट येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी संबंधित शाळेतील सहशिक्षकाविरुद्ध करमाळा पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. त्यात तिने म्हटले,की माझी १५ वर्षीय मुलगी ही वीट (ता. करमाळा) येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. मागील चार महिन्यांपासून ते दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजेपर्यंत संबंधित सहशिक्षकाने विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे.
आरोपी सहशिक्षकाने विद्यार्थिनीच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर स्पर्श केला तसेच “भेटत जा, बोलत जा” असे म्हणत तिच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मारुती ज्ञानदेव किरवे (रा. जेऊर, ता. करमाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरिजा म्हस्के करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!