जि.प प्राथ. शाळा, शेळके वस्ती (दहिगाव) शाळेला ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित -

जि.प प्राथ. शाळा, शेळके वस्ती (दहिगाव) शाळेला ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित

0

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेळके वस्ती (दहिगाव) या शाळेला ‘वृक्षमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मरवडे (ता. मंगळवेढा) येथील छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात संपन्न झाला.


या सोहळ्यात शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, विजय कोंबे तसेच माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते शाळेला सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा व शाल देऊन गौरविण्यात आले.


यावेळी दहिगाव सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र आबा शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतीराम पाडुळे, उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे, महादेव कोंडलकर, निवृत्त आदर्श शिक्षक दस्तगीर शेख, शाळेचे मुख्याध्यापक विजय राऊत तसेच सहशिक्षिका उर्मिला गंभीरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!