संभाजी ब्रिगेडच्यावतीने करमाळा शहरातुन जाणाऱ्या वारकऱ्यांना चहा , नाष्टा व फळे वाटप
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत, या वारकऱ्यांना आपणही काही मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करमाळा शहरातुन जाणाऱ्या वारकऱ्यांना चहा , नाष्टा व फळे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड करमाळा शराध्यक्ष वैभव (नाना) माने , अशोक अडसूळ, ओंकार मुसळे , आकाश घाडगे, रोहित फंड, गणेश माहुले, निखील गायकवाड इ.उपस्थित होते.