उमरड येथील तरुणाचा ट्रेकिंग करताना हृदयविकाराने मृत्यू
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील बारावीत शिकणाऱ्या तरुणाचा ट्रेकिंग करताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रायरेश्वर पठारावर चढाई करण्यासाठी गेल्यानंतर करमाळा तालुक्यातील उमरड येथील शुभम चोपडे (वय १८) याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
शुभम हा बारामती येथील शारदा विद्यालयात शिकत होता, विद्यार्थी भोरपासून काही अंतरावर असलेल्या रायरेश्वर येथील पठारावर चढाईसाठी (ट्रेकिंग) हा विद्यार्थी पठार चढाईसाठी गेला असताना होते. हा प्रकार सकाळी नऊच्या सुमारास शारदा विद्यालयाचे घडला. पठार चढाई करताना त्याला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. तो बेशुध्द पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुभमचा मृतदेह रात्री उशिरा उमरडला आणण्यात आला. त्याचे वडील प्रदीप चोपडे हे अदिनाथ साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. शुभम चोपडे याच्या मागे आई, वडील, अजोबा, भाऊ असा परिवार आहे. करमाळा तालुक्यात ही माहिती समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.