डॉ.वसंतराव बोधे यांचे वृध्द्पकाळाने निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठेतील रहिवासी व जुन्या पिढीतील डॉक्टर वंसतराव लिगाप्पा बोधे (वय-९६) यांचे आज (ता.६) पहाटे ५ वा. वृध्द्पकाळाने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, सुन, नातू असा मोठा परिवार आहे.
डॉ.वसंतराव बोधे हे जुन्या पिढीतील प्रसिद्ध डाॅक्टर होते, त्यांनी कोर्टी येथे अनेक वर्षे प्रॅक्टीस केली, रवी बोधे व परिचारिका शमा बोधे यांचे वडील तर आर.एल.बोधे गुरूजी यांचे भाऊ होते. त्यांच्यावर आज (ता.६) दुपारी १ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.