ट्रॉफी व सुवर्णपदकांचा मुथा अबॅकस अकॅडमीवर वर्षाव…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ३१ जुलै रोजी अरिस्टो किडस् अंतर्गत घेण्यात आलेल्या अबॅकस व वैदिक मॅथस् आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करमाळा येथील नावाजलेली मुथा अबॅकस वैदिक मॅथस् अकॅडमीने यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत यावर्षीही विद्यार्थ्यावर ट्रॉफी व सुवर्णपदकांचा वर्षाव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा १० सप्टेंबर रोजी यशकल्याणी सेवाभावी सदन येथे विद्यार्थी, पालक तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड. बाबूराव हिरडे व यशकल्याणीचे गणेश करे-पाटील, नामसाधना न.पा. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा माने, मुली नं. १ शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, प्रा. विष्णू शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थी, पालकांना मौलिक व उपयुक्त शैक्षणिक मार्गदर्शन केले. जर आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेत उत्तुंग यश मिळवायचे असेलतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी अबॅकस व वैदिक मॅथस् करणे अत्यंत उपयुक्त आहे; असे प्रतिपादन गणेश करे-पाटील यांनी केले.
यावेळी मानांकन प्राप्त केलेले विद्यार्थी समीक्षा थोरे, सार्थक वनारसे, अमोदिनी सागडे, सिध्दी हिरण, आदित्य सोनी, वृंदा सोनी, आदित्य कापसे, अथर्व कुलकर्णी, सानिका पंडित, अथर्व शहा, सोहम मुथा, विश्वजीत साळुंके, रिया शहा, हर्षल वाघमोडे, स्वराज विटूकडे, विराज निरवणे, प्रगती देशमुख, कृष्णा देशमुख, आदिती कानगुडे, नंदिनी कानगुडे, प्रतिष्ठा शिंदे, प्रणिती शिंदे, अद्विता शेलार, यश शहा, तनिष तळेकर, शौर्य देवकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी व पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुथा अकॅडमीच्या ज्योती मुथा व संध्या शिंदे यांनी केले.