हवामान शास्त्रज्ञ सुभाष गौतम ननवरे यांचे निधन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारतीय हवामान विभागातून सेवानिवृत्त झालेले वरीष्ठ शास्त्रज्ञ व घोटी येथील रहिवाशी सुभाष गौतम ननवरे (वय-६३) यांचे १३ सप्टेंबर रोजी निधन झाले. सुभाष ननवरे यांनी भारतीय हवामान विभाग पुणे येथे प्रदीर्घ सेवा केली. सन २००९ मध्ये अत्याधुनिक संशोधन कामासाठी हवामान विभागातून त्यांची दक्षिण कोरिया मध्ये निवड झाली. त्यांचे मुळ गाव घोटी हे असून सेवानिवृत्त तहसीलदार कै. गौतम ननवरे यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांचे मागे आई वत्सलाबाई, पत्नी शालनाबई, मुलगा मंदार, बंधू प्रा. विलासराव, मुलगी स्नेहल अनुप अभंग व बहिण विजया निलकंठ अभंग हे आहेत. अंत्यविधी प्रसंगी सर्व स्तरातील नागरीक उपस्थित होते.