मांगी तलाव शंभर टक्के भरला – तलावावर पाण्याचे पूजन दिग्विजय बागल यांच्या हस्ते संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांगी तलावात कुकडीचे पाणी महिनाभरापासुन सोडल्यामुळे मांगी तलाव आता पुर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला असून, आता शेतकऱ्याला दोन वर्षे तरी काळजी करण्याचे कारण नाही, असे मत मकाईचे चेअरमन बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडावे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सामूहिक आंदोलन केले होते, त्या आंदोलनाचे फलित झाले असेही श्री.बागल यांनी यावेळी म्हटले. मांगी तलाव शंभर टक्के पूर्ण भरल्यामुळे मांगी तलावाच्या पाण्याचे पूजन दिग्विजय बागल यांच्या हस्ते व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची घोड्यावरुन मिरवणुक काढून घोड्यावर बसूनच तलावावर नेण्यात आले.
मांगी तलावामधून मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, निलज, करंजे, खांबेवाडी, अर्जुननगर, मिरगव्हाण, बोरगाव, रायगाव, वडगाव, पूनवर, हिवरवाडी, भोसे यासह परिसरातील २० ते २५ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
यावेळी आदिनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील,भोसेचे बागल गटाचे जेष्ठ मार्गदर्शक निवृती सुरवसे, आदिनाथ कारखान्याचे मा संचालक दिनेश भांडवलकर शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख देवानंद बागल, पोथरेचे माजी सरपंच प्रतिनिधी हरिश्चंद्र झिंजाडे, शिवशंकर जगदाळे, शांतीलाल झिंजाडे, रघुवीर जाधव, सोपानकाका शिंदे ,छगन शिंदे,उपसरपंच नवनाथ बागल ,मांगीचे सरपंच प्रतिनिधी आदेश बागल, विष्णु रंदंवे अजिनाथ खटके, आप्पा नरसाळे, तात्या बागल,चंद्रकांत काळे विकास रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.