विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विवाहितेचा पैशासाठी छळ केला म्हणून सासरच्या मंडळीविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्याची न्यायालयात चौकशी होवून संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. याचा निर्णय करमाळा येथील न्यायाधीश सौ. मीना एखे यांनी दिला आहे.
यात हकीकत अशी, की वर्षा नितीन देवकते हिने १४ एप्रिल २०१४ ला नितीन विलास देवकते, विलास गेना देवकते, सीताबाई विलास देवकते व सोनाली दादासाहेब दिंडे यांच्या विरूध्द आयपीसी ४९८ अ तसेच ५०४, ५०६ प्रमाणे फिर्याद दिली होती. या फिर्यादीचा तपास पोलीस नाईक सोनकांबळे यांनी केला.
त्यानंतर त्यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. त्याची चौकशी होवून २३ सप्टेंबरला न्यायाधीश मीना एखे यांनी निर्णय दिला आहे. त्यात फिर्यादी पक्षाने सबळ पुरावा दिला नाही. तसेच स्वतंत्र साक्षीदार तपासले नाहीत व तपासातील व जबाबातील असलेल्या विसंगती यातून या संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात संशयित आरोपी तर्फे ॲड. एम. डी. कांबळे व ॲड. अजित विघ्ने यांनी काम पाहिले.