जिव्हाळा ग्रुपच्यावतीने शेटफळ येथे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन – स्पर्धकांना रोख बक्षीस व सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेटफळ (ना) तालुका करमाळा येथील जिव्हाळा ग्रुपच्यावतीने दीपावली निमित्त भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी या निमित्ताने आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या इंटरनेटच्या युगात मुलांचे बालपणच हरवून गेले आहे मोबाईल पासून दूर होऊन काही काळ तरी आपली मुलं मातीशी एकरूप व्हावी या हेतूने गेल्या नऊ वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे, महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे वैभव व आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष असणारी स्मारके आहेत त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे.
याची जाणीव आपल्या मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी सुट्टीच्या दिवसात आपली मुलांनी मोबाईल पासून काही काळ दूर राहून स्वच्छंदी बालपणाचा अनुभव घ्यावा यासाठी येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने 25 आक्टोबर रोजी या किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे परिसरातील स्पर्धकांनी आपल्या घराच्या परिसरात दगड मातीच्या मदतीने किल्ला बांधणी करायची असून यामधील उत्कृष्ट किल्ले बांधण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन स्पर्धकांचा सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेत नाव नोंदणी व अधिक संपर्कासाठी प्रशांत नाईक नवरे 8830692423 महेश सातपुते 7414967003यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान ग्रुपचे विष्णू पोळ वतीने करण्यात आले आहे.