वरकटणे येथे हाफ पीच ‘टेनिस बॉल क्रिकेट’ स्पर्धेचे आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वरकटणे (ता.करमाळा) येथे रौद्र शंभू क्रिकेट क्लब यांचेवतीने दिपावली निमित्त भव्य हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घान आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते 25 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
याप्रसंगी जि.प.चे माजी सदस्य उद्धवदादा माळी,आबासाहेब फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवसिंह देवकर , सरपंच बापू तनपुरे, रवी वळेकर, लाला पाटील,राजू पाटील, तानाजी मस्कर , समाधान देवकर रणजित देवकर, रमेश पाटील,किरण पाटील,विशाल पाटील,समाधान मस्कर,नवनाथ देवकर, ॲड.प्रवीण देवकर, विशाल देवकर, ऋषी देवकर, राहुल मस्कर,राहुल कोकाटे , नारायण देवकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस 12500 रुपये,दुसरे बक्षिस 8500 रुपये , तिसरे बक्षिस 5500 रुपये तर चौथे बक्षिस 3300 रुपये आहे.