वांगी नं 3 येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वांगी नं ३ (ता.करमाळा) येथे काल (ता.६) पुनर्वसन विभागामार्फत मंजूर नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन उपसचिव धनंजय नायक यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोणपे नायब तहसीलदार सुभाष बदे मंडळ अधिकारी खरात अव्वल कारकून दादासाहेब गायकवाड ग्रामसेवक सलीम तांबोळी उपस्थित होते.
याप्रसंगी आदिनाथचे संचालक पांडुरंग आबा जाधव मकाईचे संचालक संतोष देशमुख मा पंचायत समिती सदस्य सुहास नाना रोकडे युवा नेते युवराज रोकडे शिवराज रोकडे, वांगी विकास सोसायटीचे चेअरमन डॉक्टर विजय रोकडे दिनकर रोकडे पोलीस पाटील गहिनीनाथ क्षीरसागर यांचे सह सरपंच मयूर शेठ रोकडे उपसरपंच संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव सोमनाथ रोकडे चंद्रकांत कदम शिवाजी तळेकर गणेश तळेकर आनंद रोडे देविदास तळेकर दादा रोकडे नागनाथ जाधव संतोष निंबाळकर सुहास निंबाळकर अर्जुन तकिक बापूराव भानवसे बापूराव शिंदे आजिनाथ पांढरमिशे गणपत कापसे आनंद रोकडे शुभम रोकडे रवी दादा रोकडे परमेश्वर कदम जगन्नाथ सोनवणे दादासाहेब पवार नवनाथ शिनगारे भरत रोडे ऋषिकेश रोडे सलीम तांबोळी शहाबुद्दीन तांबोळी अनिल कळसाईत यांचे सह वांगी नंबर 3 येतील बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वांगी गावासाठी पुनर्वसन विभागामार्फत विविध जन सुविधा अंतर्गत रस्ते गटारी वीज वितरण पानंद रस्ते स्मशानभूमी साठी मागण्यांचे निवेदन श्री.नायक यांना देण्यात आले.