जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पॅनल ॲडव्होकेटपदी ॲड.शहानूर सय्यद व ॲड.अजित विघ्ने यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिल्हापरिषद, पंचायत समिती करमाळा यांचे ॲडव्होकेट पॅनलपदी करमाळा वकील संघाच्या माजी अध्यक्षा ॲड.शहानुर अहमद सय्यद तसेच वकील संघाचे ॲड.अजित विघ्ने यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ॲड.सय्यद व ॲड.विघ्ने यांना पत्र दिले आहे.
ॲड.सय्यद या करमाळा न्यायालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कायदेविषयक कामकाज अधिकृतरित्या पाहणार आहेत. प्रथमच महिला प्रतिनिधी ला विधी सल्लागार पदी संधी मिळालेली आहे. त्यामुळे या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे. ॲड. शहानुर सय्यद यांनी यापुर्वी सोलापूर जिल्हा महिला बालकल्याण समितीवर तीन वर्षे, 2016 पासुन महिला नोटरी म्हणून तर आदिनाथ मकाई कारखान्यावर व स्टेट बँक ऑफ इंडिया येथे प्रथमच महिला विधी सल्लागार म्हणून यशस्वी पणे काम पाहीलेले आहे. सध्या ॲड शहानुर सय्यद या करमाळा न्यायालयात कामकाज पहात आहेत.
ॲड.अजित विघ्ने यांचीही निवड करण्यात आली असुन, ते करमाळा न्यायालयात कामकाज पहात असतात, तसेच आता जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कायदेविषयक कामकाज पाहणार आहेत.ॲड. अजित विघ्ने यांनी यापुर्वी जलसंपदा विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, भैरवनाथ शुगर्स अशा आदी विविध संस्थावर कायदेशीर सल्लागार म्हणुन काम पाहीलेले आहे.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात आले. या दोघांच्या नेमणुकीने सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल आमदार संजयमामा शिंदे, करमाळा पंचायत समिती चे गटविकासाधिकारी मनोज राऊत तसेच करमाळा वकील संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.