राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : माजी आमदार जयवंतराव जगताप - Saptahik Sandesh

राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : आपल्या वाचाळ वाणीतून राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवनारांच्या विरोधात थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

सध्या राज्यासह देशभरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपुऱ्या ज्ञानातून अथवा कलुषित मनोवृत्तीतून अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. यातून जनतेमध्ये तीव्र स्वरूपात असंतोष आहे. मुळातच भारत देश हा विविध धर्म,जाती,पंथ,संस्कृती,भाषा यासह विविधतेने घडलेला असून देखील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत.

सध्या देशापुढे शिक्षण,आरोग्य, रोजगार,दैनदिन मुलभूत गरजा आदी जटील प्रश्न उभे असताना याकडे दुर्लक्ष करीत काही असंतुष्ट व्यक्ती थोर राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या मनातील भावना कलुषित करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत.तरी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज वा अन्य राष्ट्रपुरुष,साधू-संत,देवी-देवता अथवा धर्माबद्दल अपुऱ्या वाचनातून ,ज्ञानातून अवमानकारक वक्तव्य करणारे मग ते कितीही उच्च पदस्थ अधिकारी,पदाधिकारी अथवा सामान्य नागरिक असो त्यांच्या विरोधात थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. वेळ पडल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणून थेट कायदाच करावा अशी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!