डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर - ११ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण.. - Saptahik Sandesh

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर – ११ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण..

करमाळा / संदेश प्रतिनधी :

करमाळा : येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महात्मा ज्योतिराव फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा, तसेच राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरसकर जाहीर करण्यात आले आहे. यावेळी एमपीएससी, युपीएससी, वैद्यकिय, क्रिडा तसेच इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत विद्यार्थी गुणगौरव असा विशेष सत्कार करण्यात येणार आहे; अशी माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित कणसे यांनी दिली.

सदर पुरस्काराचे वितरण ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, संघटनेचे प्रदेश सचिव सुनील चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अतुल वारे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अमित घोगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेल्या नऊ वर्षापासून संघटनेच्या वतीने पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिष्यवृत्ती मार्गदर्शक अशा विविध विभाागतील शिक्षक तसेच द्विशिक्षकी व बहुशिक्षकी शाळांना हे पुरस्कार दिले जातात. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1

यावेळी शहाजी रंदवे, चंद्रकांत वीर, अजित कणसे, नवनाथ मस्कर, संतोष शितोळे, सुधीर माने, महेश निकत, संतोष माने, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, विकास माळी, अरूण चौगुले, शरद पायघन, सुनील पवार, शरद झिंजाडे, उमराव वीर, प्रविण शिंदे, लहू चव्हाण, सोमनाथ पाटील,दादासाहेब माळी, काशिनाथ गोमे, संपत नलवडे, अशोक कणसे, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, रघुनाथ फरतडे, भरत शिंदे, नाना वारे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे इ. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक..

वैशाली बागल, हिराबाई दळवी (अंगणवाडी क्र. २४ मांगी), महादेव शिंदे (खडकी), अतुल घोगरे (पांगरे), सतीश शहापुरे (करंजे), शहाबुद्दीन मुलाणी ( कुंभेज), पंकज गोडगे (सावडी), किर्ती भापकर (वरकटणे), वर्षा आगळे (कुंभारगाव), सुजाता अनारसे ( वीट), वनिता इंगोले (केत्तूर नं. १ ), दयानंद चौधरी (न.पा. मुली नं. १ ), सुग्रीव नीळ (हिवरे), दादासाहेब बरडे (छ.शिवाजी विद्यालय वीट), प्रा. शिवाजी वाघमोडे (भारत महाविद्यालय जेऊर)

उपक्रमशील शाळा..

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा केम, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पुजहिरावस्ती (वांगी) राजर्षी शाहू महाराज सामाजिक कृतज्ञता पुरस्कार : गणेश करे-पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!