प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजनेअंतर्गत केममधील महिलेने सुरू केला मसाला उद्योग
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथील प्रियंका निलेश ओहोळ या महिलेने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजनेअंतर्गत ‘अक्षरा मसाले’ या नावाने मसाला उद्योग केम मध्येच सुरू केला आहे.
या उद्योगाचे आज (दि.१०) उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मोहोळ विज्ञान केंद्राचे बळकुटे, प्रा. दिनेश क्षिरसागर, करमाळा कृषी अधिकारी श्री राऊत, कृषी पर्यवेक्षक भारत शिंदे,सुहास पोळके, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन मनोज बोबडे आदीजन उपस्थित होते.
यावेळी दिनेश सागर म्हणाले की, “प्रियांका ओहोळ यांनी मोहोळ विज्ञान केंद्रात मसाल्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आता त्यांनी स्वतः ग्रामीण भागात उद्योग
सुरू केला आहे, याचे आम्हाला कौतुक वाटते. त्या यशस्वी उद्योजक होतील. आजच्या सुशिक्षित महिलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरू करून स्वावलंबी बनले पाहिजे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्केटिंगची कला कशी अवगत करायची याचे मार्गदर्शनदेखील त्यांनी यावेळी केले.
कृषी पर्यवेक्षक सुहास पोळके यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमाची सविस्तर माहिती सांगून याचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमची तयारी आहे, यासाठी महिला उद्योजक पुढे आल्या पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
या वेळी बचत गटाच्या सदस्या अर्चना पवार, पूजा ओहोळ, सारिका पवार शितल गायकवाड मोनिका परदेशी, हसीणा पठाण, वर्षा ताकतोडे, रतन दावणे, महानंदा माने मालन ओहोळ, सुप्रिया देवकर, आरती ओहोळ रूक्मिणी जाधव,भिसे,पुष्पा गाडे मंजुळा पळसकर,अश्विणी शिंदे, वैशाली ओहोळ आदि महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश ओहोळ यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रियंका ओहोळ यांनी मानले.