ऊसतोड मजुरास नेले पळवून – पोलीसात गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ऊसतोड मजुरास कारगाडी मधून पळवून नेले आहे. हा प्रकार २५ जानेवारीला रात्री आठ वाजता जेऊर येथे घडला आहे. या प्रकरणी अश्विनी अमोल खंदारे (रा. जवळा, ता. दारवार, जि. यवतमाळ. सध्या कांडेकर वस्ती, जेऊर) या महिलेने फिर्याद दिली आहे.
माझे पती अमोल मधुकर खंदारे (वय ३०) हे बाजार करण्यासाठी २५ जानेवारीला रात्री आठ वाजता गेले असता. चिखलठाण चौकातून लाल रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये तिघाजणांनी त्यांना टाकून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.