करमाळा येथील राजशेखर पुराणिक यांचे निधन

करमाळा : करमाळा शहरातील प्रिंटिंग क्षेत्रातील व्यावसायिक राजशेखर पुराणिक यांचे आज (दि.१) सोलापूर येथे उपचार घेत असताना निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुन असा परिवार आहे. गुजरगल्ली येथे अजय प्रिंटिंग प्रेस नावाने त्यांचे दुकान आहे. गेले अनेक वर्षे ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२) सकाळी 10 वा राहत्या घरी गुजर गल्ली येथून निघणार आहे.