ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत कंदर येथे बैठक संपन्न.. - Saptahik Sandesh

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत कंदर येथे बैठक संपन्न..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे..:

कंदर : ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती करण्यासाठी कंदर तालुका करमाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ ग्राम सुरक्षा यंत्रणा अधिकारी गणेश लोकरे पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे उपसरपंच मौला साहेब मुलाणी ग्रामपंचायत सदस्य भीमराव इंगळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश इंगळे दशरथ काळे पत्रकार संदीप कांबळे चैतन्य पाठक शिक्षक आशा वर्कर दादा मुलाणी निसार जहागिरदार आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या ना ग्रामसुरक्षा यंत्रणा अधिकारी गणेश लोकरे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की ग्रामसुरक्षा यंत्रणा अधिक व्यापक आणि प्रभावी पणे वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे..चोरी दरोड्याची घटना गंभिर अपघात निधन वार्ता आग जळित घटना विषारी संपदर्श पिसाळलेला कुत्रा गावात येणे बिबट्याचा हल्ला वाहन चोरी शेतीमालाची चोरी ग्रामसभा ग्रामपंचायतच्या विविध योजना सार्वजनिक कार्यक्रम यांची माहिती गावातील शाळा कडून दिला जाणाऱ्या सूचना सरकारी कार्यालयाकडून माहिती देण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रांचा वापर होऊ शकतो.

तरी ग्रामस्थांनी आपापल्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा अधिक व्यापक आणि प्रभावी पणे वापराबाबत पुढे येण्याची आवश्यकता आहे.आणि हे केवळ एकाच काॅलद्वारे शक्य होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!