करमाळा शहर युवक काँग्रेस(आय) पक्षाच्या अध्यक्ष पदी सुजय यशवंतराव जगताप.. -

करमाळा शहर युवक काँग्रेस(आय) पक्षाच्या अध्यक्ष पदी सुजय यशवंतराव जगताप..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहर युवक काँग्रेस (आय) पक्षाच्या अध्यक्ष पदी सुजय यशवंतराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे हस्ते नुकतेच एका कार्यक्रमात देण्यात आले.

सुजय जगताप हे माजी आमदार कर्मवीर आण्णासाहेब जगताप यांचे नातू आहेत. करमाळा शहरात आण्णासाहेब जगताप गट अस्तित्वात असून, या गटाचे सुजय जगताप हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात वाटचाल करीत आहेत. कर्मवीर आण्णासाहेब जगताप यांची करमाळा नगरपरिषदेवर सत्ता होती. शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कर्मवीर आण्णासाहेब जगताप यांचेनंतर स्व.हरिभाऊ जगताप व स्व. अॅड. डी. पी. जगताप यांनीही नगरपालिके वर सत्ता स्थापित केली होती. त्यामुळे नगरपलिकेच्या राजकारणात या गटाला महत्व आहे. कर्मवीर आण्णासाहेब जगताप यांचेच सुजय जगताप हे वारसदार म्हणून त्यांचे नातू आहेत. सध्या ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप जगताप यांचेबरोबर काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहेत. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आंदोलने केली असून अनेक प्रश्न सोडविले आहेत. याचीच दखल घेऊन जिल्हा काँग्रेस पक्षाने त्यांची करमाळा शहरा युवकची जबाबदारी दिली आहे. या निवडीप्रसंगी महेबूब शेख, उत्तरेश्वर सावंत, सचिन कटारिया, नितीन चिंचकर, सुजय जगताप, युवकचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, विकी महानवर, गितेशे लोकरे, योगेश राखुंडे, सूरज जाधव, आदिनाथ खुटाळे, धर्मराज शिंदे, गणेश कोळी, संदेश माळवे, निखिल कदम आदी उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष प्रताप जगताप यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली करमाळा शहरात काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी व शहराच्या समस्या सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच शहरात प्रत्येक प्रभागात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्यात येतील.

..सुजय जगताप (शहराध्यक्ष, युवक काँग्रेस आय करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!