सावकारी व्यवहारात खरेदी केलेली जमीन परत देण्याचे आदेश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सावकारी व्यवहारात खरेदी केलेली जमीन परत करण्याचा आदेश सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिले आहेत.
यात हकीकत अशी की, मुरलीधर रामचंद्र वीर ( रा. शेलगाव क ) यांनी सावकाराचे जिल्हा निबंधक यांचेकडे २८/८/२०१८ रोजी तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे, की गट नं.२८३/३ मधील संपूर्ण क्षेत्र १ हे. ५३ आर. ही मिळकत पोपट सौदागर वीर (रा. शेलगाव क) याने सन २००६ मध्ये दस्तक्रमांक ४३३ / २००६ ने अटीला म्हणून खरेदी केली होती. याबाबतची संपूर्ण रक्कमप पोपट वीर यांना दिली होती. परंतू ते सदरची जमीन उलटून खरेदी देत नाहीत.
यानंतर हे प्रकरण करमाळा येथील सहाय्यक निबंधक यांचेकडे चौखशलीला पाठविले. त्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल ६/८/२०२१ ला सावकाराचे जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठविला. त्यानंतर चौकशी होऊन ७/१२/२०२२ ला कुंदन भोळे यांनी आदेश देऊन त्यात त्यांनी म्हटले आहे की पोपट सौदगर वीर यांनी ४ / २ / २००६ रोजी सावकारीच्या ओघात प्रती होती म्हणून घेतलेले खरेदीखत शेलगाव (क) येथील गट नं. २८३ / ३ मधील क्षेत्र – १ हे. ५३ आर हे मुळ मालक मुरलीधर रामचंद्र वीर यांना परत देण्यात येत आहे. वाद मिळकतीचा कब्जा हा वादींना देण्यात यावा, असाही आदेश पारित करण्यात येत आहे. या आदेशाने अनेक सावकार मंडळींना धक्का बसला आहे.