कविटगाव शाळेतील ‘अक्षर स्पर्धेत’ कु.स्वरांजली पांडव हिचे सुयश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कविटगाव (ता.करमाळा) येथील जि.प.शाळा येथील प्राथमिक शाळेत अक्षर स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये कु.स्वरांजली हरिदास पांडव हिला 100 पैकी 94 गुण मिळाले असून ह्या स्पर्धेमध्ये तिने सुयश मिळविले आहे.
यानिमित्ताने कु.स्वरांजली पांडव हिला याउपक्रमामध्ये सक्रिय सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र व बक्षीस सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ज्योतीराम भोसले, विठ्ठल बापू चौधरी, श्री.जगदाळे, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.