श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिरात शिवजयंती साजरी..

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे..
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पा वरपे होते,प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव पाटील विठ्ठल यादव ईक्रामदिन हवलदार उपस्थित होते.
यावेळी समृद्धी जाधव,शौर्य भांगे, शिवतेज पवार , करण मांडवे बुशरा पल्ला गणेश जगताप संघर्ष गोडसे ,ईश्वरी गोडसे श्रुतिका गोडसे दिशा केदार,अमृता सातव ,जोया शेख दिव्या जगताप स्वरांजली उबाळे ईश्वरी पवार यशराज आरकिले श्रेया गोडसे प्रेरणा रोकडे नयन भोजने , श्रावणी पांडव किर्ती कदम निशा केदार प्रियंका सुरवसे ,प्राची मांडवे साई माने संस्थेचे सचिव सुनील भांगे यांनी शिवाजी महाराजाबद्दल माहिती सांगितली. व मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे यांनीही माहिती सांगितली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहिनी नवले यांनी केले . कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.