करमाळा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रश्मी बागल यांना जनतेने विधीमंडळात संधी द्यावी : आमदार प्रणितीताई शिंदे - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रश्मी बागल यांना जनतेने विधीमंडळात संधी द्यावी : आमदार प्रणितीताई शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील जनतेने खऱ्या अर्थाने न्याय देवून, करमाळा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी रश्मी बागल यांना जनतेने विधीमंडळात संधी द्यावी असे प्रतिपादन सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.

करमाळा येथील दिगंबरराव बागल कृषी व औद्योगिक महोत्सवात महिलांसाठी आयोजित माहेर मेळावा कार्मक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉटर्समॉम फाँडेशन सोलापूरच्या संस्थापिका, शितल देवी मोहिते – पाटील, स्वराज गृप ऑफ इंडस्ट्रिजच्या अध्यक्ष जिजामाला नाईक निंबाळकर, कृषी महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक व माजी आमदार श्रीमती शामलताई बागल. साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, उपस्थित होत्या.

याप्रसंगी आमदार प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील, जिजामाला नाईक – निंबाळकर यांनी लोकनेते स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. व्यासपीठावर प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर यांचा सन्मान रश्मी दिदी बागल, मा. शामलताई बागल, प्रियांकावहिनी बागल यांनी केला.

प्रास्ताविकात रश्मी बागल यांनी कृषी महोत्सवाची अभिनव कल्पना स्व. मामांच्या जयंतीनिमित्ताने राबविली असून, या कृषी महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत असून या महोत्सवात महिलांसाठी माहेर मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून महिलांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा तसेच माजी आमदार शामलताई बागल यांनी देखील महिलांना सन्मानाची वागणूक देवून अनेक महिलांना राजकीय पदाधिकारी म्हणून संधी दिलेली आहे.

या कार्यक्रमासाठी प्रणितीताई शिंदे, शितलदेवी मोहिते पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्द्ल समाधान व्यक्त केले. मा.सुशिलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात स्व.मामा राज्यमंत्री होते. सुशिलकुमार शिंदे परीवार, मोहिते – पाटील परिवार आणि बागल परिवार यांचे जिव्हाळ्याचे नातं होते. यापुढील काळातही ते वृद्धींगत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शितलदेवी मोहिते पाटील तसेच स्वराज गृप ऑफ इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा जिजामाला नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुरुवातीला संदीप पाटील व प्रवीण अवचर यांनी हिंदी मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनाचेही प्रणितीताई यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास करमाळा परिसरातील हजारो महिलांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!